वाढत्या टेक्नॉलोजीच्या युगात आपण आजकाल निसर्गाचे मोठ्या प्रमाणे नुकसान करत आहोत. आपण निसर्गाच्या बाबतीत भरपुर बेजबाबदार होत चालत आहे. आपला देश हा टेक्नोलोजिच्या बाबतीत भरपुर विकसित होत चालला असेल पण आपण असे कधीही म्हणु शकत नाही कि, आपले पर्यावरण सुधा आपल्या देशाच्या टेक्नॉलोजिएवढे चांगल्या प्रकारे विकसीत होत चालले आहे. या आधुनिक जिवनात आपण पर्यावरणाला दुर लोटत निघत आहोत. याचाच परिणाम असा आहे कि संपुर्ण झाडे, प्राणी, पक्षी हे आपल्या पासुन दुरावत चालले आहेत. आज आपण अशा प्राणि, पक्षी याच्यांविषयी बोलणार आहोत जे आपल्या देशातुन लुप्त झाले आहेत अथवा पुढिल काही वर्षातच हे पुर्णपणे लुप्त ( नष्ट ) होणार आहे.
भारतातुन विलुप्त झालेली व होणारी प्राणी पक्षांच्या प्रजाती : -
प्राणी : Animal
- काळा हरिण : black deer -
- लाल पांडा : red panda -
- रायनो : ग़ेंडा -
- बंगाल टायगर -
- चित्ता :
(3) : रायनो :
ग़ेंडा हा जीव सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी आहे. गेंड्याच्या पहिल्या 40 प्रजाती विकसीत होत्या. पण आता त्यांचे फक्त 5 प्रजातीच अस्तित्वात आहे. गेंडा हा प्राणी जास्त पाण्याच्या ठिकाणी राहणे पसंद करतो. गेंड्याच्या नाकाच्या समोर टोकदार शिंग हे त्यांना संकटात असल्यावर वर कामी येतात. गेंडा हा प्राणी येणा-या काळात पुर्ण पणे नष्ट होण्याच्या संपुष्टात आहे. याचे असे कारण आहे मानव स्वताच्या फायद्या साठी गेंड्याचा मोठ्या प्रमाणात शिकार करीत आहे. त्याच्या नाकावर असणार-या शिंगासाठी गेंड्याचा शिकार केला जातो. या गेंड्याच्या शिंगाचा बाहेर देशात व्यापार केला जातो. आपल्या देशात भारत सरकारने गेंड्याच्या शिकारीला पाबंदी लावण्यात आली आहे. तरी सुधा भारतात गेंडे हे मोजण्या येवढेच अस्तित्वात राहिले आहेत.
(4) : बंगाल वाघ :
वाघ हा आपला राष्ट्रिय प्राणी आहे. वाघाच्या जातीमध्ये असे कितीतरी प्रजाती आहेत ते पुर्णपणे विलुप्त झाले आहे. भारतात वाघाच्या प्रजाती या हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी आहे. आत्ता अस्तित्वात असलेल्या प्रजाती मधील बंगाल टायगर हा विलुप्त होण्याच्या कगारीवर आहे. या वाघाची संख्या भारतातुनच नाही तर प्रत्येक देशातुन वर्षानुवर्ष कमी होत चालली आहे. येणा-या काळात हा प्राणी पुर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे. बंगाल टायगर हा भोवतेकसा पाण्याच्या ठिकाणी व घन्या जंगलात आढळुन येतो. हा प्राणी लुप्त होण्याच कारण म्हणजे होणारे शहरीकरण व या प्राण्याचा शिकार करुन याची कातडी काढली जाते. अशा अनेकशा कारणाने हा प्राणी विलुप्त होण्याच्या यादित आहे. भारत सरकारने या वाघावर विलुप्त होण्याच्या कारणामुळे याच्याकडे लक्ष देत आहे. बंगाल टायगर कशे जिवंत राहतील याची सुद्धा काळजी घेतं आहे.
(5) चित्ता :
चित्ता हा प्राणी हा आपल्या भारतातुन नष्ट झालेला अतिशय गतिशील प्राणी आहे. चित्ता हा प्राणी नष्ट झाल्याची बातमी ही काही वर्षा अगोदरच भारत सरकारने सांगितली होती. चित्ता हा प्राणी इतर वाघ सिंहा एवढा जास्त हिंसक प्राणी नसतो. त्याचे आहार हे हरीण, ससे व इतर कोणतेही मांसाहारी प्राणी आहे. चित्ता हा झाडाझुडपात राहुन शिकार करतो. चित्ता हा भारतातुन कमी होण्याचे हे कारण सांगीतले आहे की चित्ताला तेच्या सुंदर दिसणार-या कातडी साठी त्याचा शिकार केला जातो.
- चिमणी :
- गिधाड :-
- माळढोक :-
- चमचा वाली चिमणी :
- सारस
1) चिमणी :
चिमणी हा एकमेव असा पक्षी आहे कि त्याच्यापासुन आपल्या लहानपणीची आठवणी जुळल्या गेल्या आहेत पहिला चिमण्यांचे कितीतरी घरटे पाहायला भेटायचे पण आजच्या युगात चिमणी हा पक्षी आजकाल दिसायचे सुधा कमी झाले आहे. आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या अवती भोवती अनेक चिमण्या दिसायचे पण असे काय झाले आहे की या चिमण्यांचे प्रमाण हे दिवसांदिवस कमी होत चालले आहे. चिमण्या बचावा साठी अनेक चिडियाघर सुधा बांधण्यात आले आहे. पण आपले वाढणारे तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व कमी होत चालले आहे.
2) गिधाड :
आपण सगळ्यांनी गिधाड या पक्षाचे नाव हे ऐकलेच असावे. गिधाड ला English मधे vulture ( वल्चर ) सुधा म्हटले जाते. गिधाड हा पक्षी आपले पर्यावरण संतुलित ठेवण्याचे काम करत असतो गिधाड हा पक्षी मृत प्राण्यांचे व मृत सडलेल्या मानवी शरीराचे मांस खाऊन आपले जीवन जगतात. त्या सडलेल्या मृत शरीर किंवा प्राण्यांच्या शरीराला खावुन रोगराई थांबवण्याचे काम हे गिधाड पक्षी करत असतात. गिधाडांचे काहि प्रकार सुधा आहेत. white vulture आणी red vulture. बदलत्या काळानुसार गिधाड या पक्षाचे अस्तित्व हे कमी झाले आहे. गिधाड कमी होण्यामागचे कारण म्हणजे प्राण्यांना व मानवाला चांगल आरोग्यासाठी वापरण्यात येणारी औषधाचे सेवन केल्याने व तिच प्राणी मृत्युमुखी पडुन त्याचे मांस खाल्याने त्या औषधांचा गिधाडांवर वाईट परीणाम होऊन ते मृत्यृमुखी पडतात हेच कारण आहे कि गिधाडांचे अस्तित्व संपुष्टात येण्याचे.
read us - पृथ्वी व सजीव सृष्टी जन्म
3) माळढोक :
त्यालाच English मधे the great Indian
bustard सुधा म्हणतात. हा पक्षी पुर्णपणे नष्ट होण्याच्या कगारीवर आहे. या पक्षीला गवताळ
असलेल्या जाग्यावर वावरायला आवडते. हा पक्षी आपले आहार म्हणुन छोटे मोठे किडे व कडधान्याचे
सेवन करतो. माळढोक या पक्षाचे लांबसरट पायांमुळे हा अतिशय गतीशील पक्षी आहे. हा पक्षी
महाराष्ट्र कर्नाटक व राजस्थान या राज्यात आढळुन येतो. या पक्षीचे महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्हात याचे अभयारण्य आहे शासनाने या पक्षांचे अस्तित्व ठिकवुन ठेवण्यावर लक्ष
केंद्रित केले आहे.
4) चमचा वाली चिमणी :
या पक्षाला English मध्ये स्पुन बिल्ड सेंडपाइपर या नावाने ओळखले जाते हा पक्षी
खुप दुर्मीळ प्रजातीचा पक्षी आहे. हा पक्षी दिसायला चिमणी सारखा दिसतो. पण त्याची समोरची
चोच ही लांबट चमचा सारखी दिसणारी असते म्हणुन त्याला spoon – billed sandpiper असे
म्हणतात. या
पक्षाच आहार पाण्यातल्या माशे व किंड्याना खाऊन करतो हा पक्षी सुधा भारतातुन लोप
पावत चालला आहे.
या पक्षाला English मध्ये Crane सुधा म्हटले जाते पारस हा पक्षी दिसायला सुंदर आहेच पण भारतातला सर्वात उंच उडणारा व उंच दिसणारा पक्षी आहे हिंदु धर्मात या पक्षीला प्रेम व समर्पणाचे प्रतिक मानले गेले आहे . हिंदु धार्मिक ग्रंथात या पक्षाला विषेश महत्व दिले गेले आहे. या पक्षाचे अस्तित्व कमी होण्यामागचे कारण म्हणजे होणारे औद्योगिकीकरण होय. येणा-या काळात हा पक्षी पुर्ण पणे विलुप्त होणार आहे.
हे येवढेच प्राणी संपुष्टात
आहेत असे नाही. असे कितीतरी प्राणी व पक्षांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. व येणा-या काळात
काही प्राणी पक्षांची प्रजाती सुधा नष्ट होणार आहे. व या सगळ्यांला जबाबदार हे फक्तनंफक्त आपण मानवच असणार आहोत.
जिवित प्राणी, पक्षांच्या प्रजातीचे रक्षण कशा प्रकारे करावे. :-
जर आपल्याला यांचे अस्तित्व पुर्णपणे नष्ट होण्यापासुन
जर थांबवायचे असेल तर आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहीजे. जंगलाची निर्मीती केली
पाहीजे. वायुप्रदुषण, जलप्रदुषण, इतर कोणतेही प्रदुषणा पासुन पर्यावरण स्वच्छ व निरोगी
ठेवले पाहिजे. तंत्रज्ञानाचा जेवढ कमी होईल तेवढे त्याचा वापर कमी केला पाहिजे. प्राणी,
पक्षांच्या शिकारीला विरोध केला पाहिजे तरच त्यांचे संरक्षण चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचें अस्तित्व
टिकवुन राहू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box