तुळशीचे महत्व-: Importance Of Tulsi
प्रामुख्याने तुळशीचे रोप हे आपल्या जिवनासाठी खुप महत्वाचे आहे. तुळशीला इंग्लिश मध्ये होली बेसील, हिंदी मध्ये तुळशीला तुलसी या नावाने उच्चार केला जातो. तुळस हि एकमात्र अशी वनस्पती आहे जी आपल्याला 24 तास ऑक्सीजन देते. हिंदु धर्मात तुळशीला भरपुर महत्व दिले गेले आहे. हिंदु धर्मावर आस्था ठेवणा-या प्रत्येक व्यक्तिच्या घराच्या समोर तुळशीचे रोप हे असतेच. हिंदु धर्मात तुळशीला पवित्र मानली जावुन तीची पुजा केली जाते. तुळशीचा उल्लेख हा प्राचीन हिंदु व इतर ग्रंथांमध्ये सुधा केला गेला आहे. तुळशीला लक्ष्मीचे रुप सुधा म्हटले जाते. आपण तुळशीच्या रोपाची पुजा केली तर आपले जीवन हे सुखमय होते. जीवनातील अनेक संकटे हे दुर जातात. तुळशीचे रोप हे आयुर्वेदिक औषधिक वनस्पती सुधा आहे. या तुळशीच्या रोपातील गुणांचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्माण केली जातात. पहिल्याच्या काळामधे ऋषीमुनी साधु-संत, वैद्य हे एखाद्या रोगी आजारी माणसांचा आजार बरा करण्यासाठी तुळशीच्या पानांचा काढा करुन तुळशीच्या पानांचे सेवन करायला सांगायचे. भारतातच नाही तर संपुर्ण जगामध्ये तुळशीच्या रोपाला आरोग्यदायी म्हटले गेले आहे.
तुळशीचे दहा फायदे : 10 benefits of tulsi:
1) सर्दी- खोकल्याने त्रस्त असलेल्या व्यक्तीने जर तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने किंवा तुळशीचा काढा करुन सेवन केल्याने सर्दी खोकला कमी होतो. तापा वर सुधा तुळशीचे पान खाल्याने ताप कमी होतो.
2) जर आपण तुळशीच्या पानांचे सेवन दररोज केले तर आपल्या जिवनातील ताणतणाव हे कमी होतात. तुळशीमधे तणाव दुर करण्याचे गुणधर्म असतात.
3) तुळशीच्या पानांचे सेवन करणारा व्यक्तियांच्यामध्ये सकारात्मक विचारांचा संचार होतो. आणी आत्मविश्वास सुधा वाढतो.
4) आपण दैंनंदिन जीवनात चहा, कॉफी, दुध हे पितोच जर तुळशीच्या पानांना सुकवुन त्याच्या कुट करुन दुध, चहा, कॉफी मध्ये 1 चमचा मिसळुन सेवन केल्याने आपली पाचन शक्ती वाढते. आणी रक्त शुद्ध होते. आणी पोटांचे विकार सुधा कमी होतात.
5) तुळशीच्या रोजच्या सेवनाने आपल्या मेंदुतील न्युरॉन्स चे प्रमाण हे वाढते. त्यामुळे आपल्या स्मरणशक्ती वाढते.
6) दातामध्ये जर ठणका मारणे, दुखणे किंवा दातामधुन दुर्गंध येत असेल तर तुळशीचे पान हे लवंगा बरोबर चावत राहिल्याने दातातील किड व जंतु नाहीसे होऊन दातांमध्ये ठणके मारणे कमी होते. तोंडातुन वास येणे बंद होते.
7) शरीराला खाज, सुजण असल्याने तुळशीच्या पानांचा कुट करुन अथवा तेल करुन जर खाज, सुज असलेल्या ठिकाणी लावले तर खाज येणे, सुज हे कमी होते.
8) जर कोणत्याही कारणाने जर आपल्याला थोडीफार दुखापत, जखम झाली तर तुळशीच्या पानांचा कुट करुन त्या ठिकाणी लावल्याने जखम हे बरी होते. (जर जखम मोठ्या प्रमाणात झाली असेल तर आपण चिकित्सालयात जावुनच उपचार करावे )
9) प्रवासामध्ये जर उल्टी होत असेल तर प्रवासाच्या आधी लवंग बरोबर तुळशीची पाने खाल्याने उल्टी होत नाही.
10) उपाशी पोटी जर तुळशीचे पान व बीया खाल्ले तर हद्यरोग सारखा आजार हा कमी होतो. तसेच तुळशीच्या सेवनाने किंडणीवर सुधा चांगला प्रभाव पडतो.
तुळशीच्या
सेवनाने अशा अनेक प्रकारच्या आजारावर मात केली जाऊन शरीर निरोगी ठेऊ शकतो.
तुळशीचे चेहऱ्यावर होणारे फायदे :- the benefits of tulsi on the face
तुळस हे आपल्या चेहऱ्यावर चांगला प्रभाव टाकते. आपण तुळशीच्या पानांचा कुट करुन खोबरेल तेलात मिक्स करुन चेहऱ्याला लालावल्याने चेहऱ्यावरचे पिंपल्स सारखे डाग नाहीसे होतात. तुळशीचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळुन निघतो. चेहऱ्यावर कोणतीही डस्ट बसत नाही. चेह-यावर मच्छर हि बसत नाही.
तुळशीच्या पानांचा काढा कसा बनवावा : - How to make Tulsi kadha
सर्व प्रथम एका भांड्यामधे एक दिड ग्लास पाणी गरम करुन घ्यावे त्यानंतर तुळशीची 15 ते 20 पान घ्यावी किंवा तुळशीचे पाच अंग़ घेतली तरी चालेल. तुळशीच्या पाच अंगामधे तुळशीच्या बिया, तुळशीचे पान, तुळशीचे साल, तुळशीचे मुळ, आणी तुळशीची फांदी. यांचा समावेश होतो. त्यानंतर थोडस आल, 7 ते 8 लवंग आणी थोडीशी हळद गरम पाण्यामधे समावेश करुन घ्यावी. पुदिना असेल तर तो सुधा टाकला तरी चालतो. त्यानंतर त्या काढ्याला 5 ते 7 मिनिट उखळी काडुन घ्यावी. त्यामुळे त्याच्या मधील असलेले गुणधर्म त्या पाण्यामध्ये मिक्स होतील. काढा उखळुन झाल्यावर तो थंड कोमट करुन सेवन करावे त्यामुळे आपले शरीर हे निरोगी राह्ते. आपल्या शरीराची चर्बी सुधा कमी होते. हा काढा सर्दी- खोकल्या साठी भरपुर फायदेमंद आहे.
भारतामध्ये तुळशीचे अनेक प्रकार
पडतात त्याच्यातील हे पाच मुख्य प्रकार आहेत.
1) विष्णु तुळस
2) रान तुळस
3) श्याम तुळस
4) राम तुळस
5) लिंबु तुळस
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box