योग चा अर्थ meaning of yoga :- 


योग हा आपल्या जिवनातील अनमोल भाग आहे. आपले शरीर हे योग्य प्रकारे संतुलित व निरोगी ठेवण्यासाठि आपण योग केले पाहिजे. योग हा आपले शरीर संतुलित व निरोगी ठेवण्यापर्यंतच सीमीत नसतो. व नाही व्यायामापर्यंत सीमित असतो. योगाचा भरपुर संश्पित अर्थ आहे योगाचा असा अर्थ म्हटल किंवा मानला जातो कि, आपण योग साधन करताना आपण हे जग सोडुन दुसऱ्या जगाची अनुभुती होते. आपल्याला आत्माशी मिलन होते. आपल्याला एक प्रकारचे वेगळे विशिष्ट विश्व, ब्रमांड योगध्यान मधे दिसते. आपल्याला आपल्या जिवनातील अनेक प्रश्नांचे उत्तर मिळतात. पहिल्याच्या काळच्या साधु संताना ज्या सिद्धिया प्राप्त झाल्या त्या योग साधणामुळेच प्राप्त झाल्या आहेत. म्हणुन आपल्या जिवनात योग हे भरपुर महत्वाचे मानले जाते. 

योगासनाचे महत्व importance of yoga :- 

योगासन हे आपल्या शरीरासाठि भरपुर लाभदायी आहे. आपले शरिर सुंदर, संतुलित व निरोगी ठेवण्यासाठि योगासनाचा उपयोग होते तुम्हांला माहित आहे का आपल्या जगात 70% आजार व रोग हे योगासन केल्याने बरे होतात. जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण सग़ळ्या प्रकारच्या रोगावर मात करु शकतो. आपली इच्छाशक्ति हि योग व योगासन केल्याने वाढते. योगासनाचे भरपुर फायदे आहेत व ते फायदे आपल्या शरिरावर व जिवनावर प्रभाव पाडतात. योगासन केल्याने आपले मन हे शांत राहते डोक्यातिल त्रास देणारे विचार हे कमी होतात आपण समाजामधे चांगले जिवन जगण्यास प्रवत्त होतो.

                   आपल्या शरिरावर चांगले प्रभाव पाडणारे आसन पुढिलप्रमाणे.

योगासन चे प्रकार व त्या पासुन होणारे लाभ फायदे :-

1)पद्मासन :- (Lotus Position)

           पद्मासन हे जमिनिवर बसुन दोन्हि पाय आपल्या मांडिवर नाभिजवळ घेउन हे आसन केले जाते. या आसनला कमळासन सुधा म्हटले जाते. या आसन करताना  आपल्या शरिराची आक्रुति हि कमळा सारखी होते. या आसनाचा असा फायदा आहे कि या आसनमुळे आपले मन हे शांत राहते. व आपल्या पायातिल नाडि हे मोकळ्या होतात ज्यांना कोणाला पायामधे सारखा वात किवा पेडगा येत असेल त्यांनि हे आसन केल्याने पायातिल वात येणे हि कमी होते. हे आसन केल्याने आपले पचनक्रिया सुधा वाढते.

2) ताडासन : (Mountain Pose)

           ताडासन करण्यासाठि एका स्वच्छ परिसर व चांगली जागा बघून त्या जागेवर ताट उभे राहुन आपले हात वरच्या दिशेला करुन दोन्ही हाताचि बोटे एकत्र करावे व आपल्या पायाचि टाच वर करावे या प्रकारे हे आसन केले जाते या आसन मधे आपले शरिर हे पर्वता सारखे होते. हे आसन केल्यान गुडघा दुखी किंवा पायाचे इतर दुखणे सुधा कमी होते हे आसन केल्याने आपल्या ऊंची मधे सुधा वाढ होते. हे आसन केल्याने पित्ताचा त्रास सुधा कमी होतो 

3) सिद्धासन :(Accomplished Pose)

            सिद्धासन करताना  जमिनिवर बसुन शांतपणे ध्यान अवस्थेत बसावे आपला पाठिचा कणा हा ताट असावा आपला पायाचा गुडगा हा जमिनिला टेकलेला असावा आपल्या हाताची बोटे हि ज्ञान मुद्रा अवस्थेत असावी लागतात. आपली डोळे बंद असावी. हे आसन केल्याने आपले मन हे एकदम शांत स्थिर राहते आपला मेंदु हा जास्त सक्रिय होतो. आपली कूंडलिन शक्ती जाग्रुत होण्यास मदत होते. हे आसन केल्याने मुळव्याध सुधा कमी होण्यास मदत होते.

4) वज्रासन : (Diamond Pose)


          प्रथम आपण जमिनिवर बसुन घ्यावे. हे आसन करण्यासाठि आपल्या दोन्हिं पायाला गुडग्यातुन वाकुन पाठच्या दिशेला घ्यावा कमरेचा खालचा भाग हा दोन्ही पायांवर ठेवावा. अशा प्रकारे हे आसन केले जाते. हे आसन केल्याने आपले वजन आपली पोटाची चर्बि कमी करण्यास मदत करते. या आसनाने कब्ज सुधा कमी होतो हे आसन केल्याने कंबर दुखणे किंवा कंबर चे इतर आजार सुधा कमी करण्याचे काम करते. हे आसन दररोज केल्याने आपल्याला याचा भरपुर फायदा होतो.

5) भद्रासनं : (Cobbler Pose)

                     हे आसन करण्यासाठि प्रथम जमिनिवर बसुन घ्यावे. आपले पाय हे लांब सोडावे. दोन्हि पाय हे गुडघ्यातुन दुमडुन दोन्हि पायाचे तळवे हे एकत्र जोडुन घ्यावे. दोन्हि हाताने दोन्हिपायाचे चवडे धरुन आपल्या स्वताच्या दिशेन आणावे. हे आसन केल्याने आपली स्मरण शक्ति वाढते आपली बुद्धि हि जास्त सक्रिय होते. हे आसन केल्याने पोटाचे आजार कमी होतात आपली थकान हि कमि होते. हे आसन ज्यांचे गुडघे दुखत असतिल कींवा गुडघ्याचे ओपरेशन  झालें असतील त्यांनि हे आसन करु नये.         

6) वक्रासन : (Twisted Pose)  

           या आसना मधे आपले पुर्ण शरिर हे वाकडे होते म्हणुन या आसनाला वक्रासन असे म्ह्णतात हे आसन जमिनिवर बसुन केले जाते या आसनामधे आपले शरिर हे उलट दिशेला वळवले जाते चित्रात दाखवल्या प्रमाणे हे आसन केले जाते. हे आसन करताना एकाच दिवशि पुर्णपणे शरिराला किंवा मानेला ताणु नये याचा दररोज सराव करा हे आसन केल्याने पोटाचे आजार कमि होतात व आपल्या पोटाचि चरबि कमि होते व किंडनि किंवा मुत्रपिंड चे आजार सुधा कमी करतो. हे आसन अशा लोकांनी करु नये ज्यांचे पाठिच्या मनक्याचा, पोटाचा किंवा कंबरेचा आजार असेल योग्य तो गाईडन्संचा सल्ला घेऊन हे आसन करावे.


7)भुजंगासन : (Cobra Pose)

           या आसनाला सर्पासन सुधा म्हटले जाते. या आसना मधे प्रथम जमिनिवर पोटावर लांबपायकरुन झोपले जाते. कमरेचा मागचा भाग हा जमिनिला ठेकुन कमरेचा वरचा भाग हा जमिनिला दोन्हि हाताने पुश करुन वर करावे आपले शरिर हे वरच्या दिशेला तानले जाते आपल्या शरिराची आक्रुति सापाच्या फन्या सारखी होते हे आसन केल्याने अनेक प्रकारचे रोग हे दुर होतात व आपल्या पाठदुखी अंगदुखी या आजारापासुन आपल्याला दुर ठेवते आपली हाडे हि मजबुत होतात गॅसची समस्या दुर होते. या आसनाने आपल्या चेहर्यावर तेज येतो. हे आसन केल्याने किडनीवर चांगला प्रभाव पडतो. ज्यांना कोनाला कमरेचा किंवा इतर कोणताहि ग़ंभिर आजर असेल त्यांनि आपल्या चिकित्सकाचा सल्ला घेवुनच हे आसन करावे.

8) वृक्षासन  : (Tree Pose) 

          या आसन मधे आपल्याला एकापायावर उभे राहुन (बेलेंन्स करुन) हात वर करून सुर्यनमस्कार केला जातो. या आसनामधे आपल्या शरिराचि आक्रुति हे झाडासारखी होते. हे आसन आपले मन विचलित होण्यापासुन थांबवते. आपले शरिर हे योग्यप्रमाणे संतुलित करण्यासाठि किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठि हे आसन योग्य आहे या आसनाने आपल्या पाठिचा कणा हा मजबुत होतो. हे आसन दररोज केल्याने आपल्या शरीरात रक्त पुरवठा जास्त होतो आपले पायांची हाड हे मजबुत व लवचिक होतात. 

9)त्रिकोणासन : (Triangle Pose) 

         हे आसन भरपुर महत्वाचे मानले जाते  हे आसन करताना आपल्या शरीराची आक्रुति हे त्रिकोनासारखी होते म्हणुन याला त्रिकोणासन म्हटले जाते या आसनामधे जमिनिवर दोन्हि पाया मधे 2 ते 3 फुट अंतर ठेवुन आपल्या हाताने पायाच्या अंगठ्याला टच केले जाते याच्यासुधा काहि प्रकार पडतात हे आसन गुणकारी आहे हे आसन केल्याने पाचन शक्ती वाढते आपली मान कंबरचे स्नायु हे मजबुत व लवचिक  होतात आपली थकवट कमी होते व शरिर संतुलित राहते. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा कंबरेचा गंभिर त्रास किंवा पोटदुखिचा त्रास आहे त्यांनि आपल्या डॉक्टरांना विचारुन हे आसन करावे. 

10)शीर्षासन : (Headstand Pose)

            हे या आसनाला आसनांचा राजा सुधा म्हटले जाते या आसना मधे आपले खाली डोके वर पाय असते हे आसन भरपुर कठिन आसन आहे पण त्याचे फायदे सुधा तेवढेच चांगले आहे या आसनाने आपल्या शरिरातिल रक्तपुरवठा हा मेंदुकडे वेगाने होतो. त्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळते.  या आसनाने पाचनक्रिया हि व्यवस्थित होते, हे आसनकेल्याने आपले हात हे मजबुत होतात. आपल्या केसांसाठि हे आसन भरपुर महत्वाचे आहे ज्यांचे कोणाचे केस हि पातळ कमजोर किंवा पांढरी झालि असतील तर या आसनाने केस हि मजबुत व काळि होतात या आसनाने अनेक रोग हे कमी होतात व आपले शरिर हे निरोगी होते या आसनाचे अनेक फायदे आहेत.

हि दहा आसन हि आपल्या दैनंदिन जिवनात खूप महत्वाची आहेत या आसनाने आपले शरीर व आरोग्य हे निरोगी सुंदर राहते.