प्लास्टिकमुळे पर्यावरणावर व जिवनावर होणारे परिणाम :-

                    आपण पाहात आहोत कि आजकालच्या काळात प्लास्टिकचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. आणि याचा आपण विचार सुधा करु शकत नाहि. आपण सकाळि उठल्यापासुन ते रात्रि झोपेपर्यंत आपल्या जिवनात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणे वापर होत असतो. आपण बसतो ती खुर्ची प्लास्टिकची आपण सकाळि उठुन ब्रश करतो तो सुधा प्लास्टिकचा आपण जेवताना वापरलेला ताट वाटि प्लेट हि सुधा प्लास्टिकचीच असण्याचि भरपुर शक्यता असते. आपण वापरणारे तांत्रिक गोष्टिमधे पण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो, अशा प्रकारे कोणत्याना कोणत्या कारणाने आपल्या जिवनात प्लास्टिकचे वापर होत असतो. 

       
                    प्लास्टिकचे प्रमाण दर वर्षि अरबोंच्या प्रमाणात वाढत आहे. अनेक प्लास्टिक कंपनी सुधा निर्माण होत चालले आहे. आणि त्याच्यातच मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिकचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत सिंगल युज प्लास्टिक पिशवी आपण कोठेहि टाकतो, व बाजारात अशा पिशविला भरपुर मागणी असते. सिंगल युज प्लास्टिकचे काम झाले कि आपण ते रस्त्यावर किंवा गटारात टाकतो, त्यामुळे गटारातिल वाहते पाणि हे प्लास्टिक टाकल्याने पुढे वाहत जात नाहि ते पाणि तिथेच एका ठिकाणि साठुन राहते. त्यामुळे त्या ठिकाणि खुप घान वास व रोगराई पसरते, अशा अनेक गोष्टि आहेत कि रस्त्यावर प्लास्टिक टाकल्याने त्याचा मानवी जिवनावर व पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. आपल्याला माहित आहे कि प्लास्टिक हे हजार वर्षापर्यंत नष्ट होऊ शकत नाहि आपण त्याला जाळु सुधा शकत नाहि जाळले तर त्याच्यातुन निघणारे घातक वायु हे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी करण्याचि शक्यता असते. किंवा त्याला जमिनित पुरु किंवा गाडु हि शकत नाहि, जर जमिनित प्लास्टिक पुरला तर जमिनिमधे असलेले गुणधर्म नष्ट होऊन जातात व जमिन हि नापिक होते व त्यामुळे भुमी प्रदुषण होते.

                 
          व प्लास्टिकला आपण समुद्रात सुधा टाकु शकत नाहि त्यामुळे जल प्रदुषण होते आपण पाहत असतो कि समुद्राच्या किनाऱ्याशी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा व प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात. जेव्हा समुद्रात भरती किंवा लाटा येतात तेव्हा ते किनाऱ्यावरचा सर्व कचरा ते आपल्या कडे समुद्रात वढुन घेत असतात. आपल्याला माहित आहे का आपल्या समुद्रात दर वर्षि 90,00000 टन कचरा हा समुद्रात टाकला जातो त्याच्यात प्लास्टिकचे प्रमाण सुधा जास्त असते. त्यामुळे समुद्रात असणारे जलचर प्राणी किंवा मासे ते प्लास्टिक खातात त्यामुळे ते मरुन जातात छोट्या माशांना मोठि मासे खात असतात त्यामुळे ते प्लास्टिक मोठ्या माशांच्या पोठात जातात त्यामुळे त्यांना भुक लागत नाहि, व भुक न लागल्याने ते मरुन जातात. त्यामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण हे अतिशय कमी होत चालले आहे.


                हिच गोष्ट पाळिव जनावरां बरोबर सुधा होते आपण कचरा हा प्लास्टिकच्या पिशवितुन बांधुन बाहेर टाकुन देतो व तोच कचरा बाहेर फिरनाऱ्या गाई म्हशी या प्लास्टिक सकट खातात, व काहि दिवसाने मरुन जातात. पाहण्यात येते कि गायी म्हशी यांच्या अवशेषातुन मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे प्रमाण आढळुन आले आहे. प्लास्टिकचे परिणाम हा पर्यावरणावरच नाहि तर त्याचा प्रभाव हा मानवी जिवनावर सुधा पडत चालला आहे. जर माणसाच्या शरिरात चुकुनहि प्लास्टिकचा छोटा कण सुधा गेला तर माणसाचि संपुर्ण शरीराची इंद्रिये बंद पडण्याची शक्यता असते. किंवा आपल्याला कॅंन्सर सुधा होण्याचि शक्यता असते त्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर हा कमी केला पाहिजे.

प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यासाठि उपाययोजना:-

                     प्लास्टिकचा दिवसेंदिवस वाढता वापर हा पर्यावरणावर व मानवी जिवनावर प्रभाव टाकत चालला आहे जर आपण आत्ताच काहि केले नाहि तर संपुर्ण पर्यावरण व मानवी जिवनाचे संतुलन खराब होईल व भविष्यात आपल्याला अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागेल.

1.  पहिलि गोष्ट म्हणजे आपण जर सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणे टाळला पाहिजे, व त्याच्या जागी आपण कापडी पिशविचा वापर केला पाहिजे. 

2.  प्लास्टिकचा पुर्नवापर करणे जेणे करुन प्लास्टिक नियंत्रित आणण्यास मदत होईल. 

3.  आपण जे लहान मुलांना प्लास्टिकच्या खेळण्या देतो ते देणे टाळावे, त्याच्या एवजी लाकडाची किंवा दुसर्या प्रकारची खेळणि खरेदि करुन द्यावे. 

4.  प्लास्टिक बंदी विषयी गावागावात रॅली काढणे जो पर्यंत गावातील माणसांना प्लास्टिक बंदिचे महत्व पटवुन देवु शकत नाहि तो पर्यंत प्लास्टिकचे प्रमाण कमी होवु शकत नाही. 

5.  गावागावात प्लास्टिक बंदि किंवा सिंगल युज प्लास्टिकच्या निषेधावर बॅनर बनवुन लावणे, जेणे करुन सर्व लोक त्याचे पालन करतील. 

6.  प्लास्टिकचा कचरा टाकण्यासाठि कचरापेटिचा वापर करावा कचरा इकडे तिकडे टाकु नये. 

7.  सरकारने प्रत्येक गावात कचरा जमा करण्यासाठि कचरा गाडीची व्यवस्था केली आहे, त्यामुळे आपण सग़ळा इतर व प्लास्टिकचा कचरा त्या गाडित टाकावा जेणे करुन कचरा साफ करणारे कामगार त्याचा योग्य प्रमाणे विल्हेवाट लावतील. 

8.  आपण जे प्लास्टिकच्या बाटलितील कोल्डड्रिंक पितो व त्याच्या बाटल्या आपण कोठेहि टाकु नये त्या बोटल्स योग्य त्या ठिकाणि टाकावे. 

9.  आपण प्लास्टिकचा कचरा हा गटारी नाल्यात टाकतो त्याच्यामुळे गटारीतील घाण पाणि हे एका ठिकाणी साचुन राहते व पावसाळ्यात सर्व कचरा हा बाहेर पडतो त्यामुळे रोगराई होण्याचि शक्यता असते. 

10.  आपण  प्लास्टिकची अशा प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे कि त्याच्यामुळे पर्यावरणाला कोणत्याहि प्रकारची हानि होनार नाहि.

आपण जर या जबाबदारि किंवा हि दशता पाळली तर प्लास्टिक कमी होण्यास किंवा त्याला नियंत्रित आणण्यास मोठि मदत होईल व त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होइल.



प्लास्टिक बंदि घोषवाक्ये :

  • प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा, 
  • प्लास्टिक हटवा व धरतिचा जिवन वाढवा, 
  • आपला एकच नारा प्लास्टिक हटवा सारा, 
  • आपली एकच संकल्पना प्लास्टिक हटाना, 
  • रस्त्यावरचे प्लास्टिक हटवणार आणि प्रांण्याचे जिवन वाचवणार, 
  • एकत्र पाहुले टाकत चला आणि प्लास्टिकला हटवत चला. 
  • प्लास्टिक आपल्या जिवनचा हत्यारा चला त्याला नष्ट करु हा संकल्प हमारा, 
  • कापडि पिशवी वापरुया आणि प्लास्टिक पिशवि दुर करुया