कुंडलीन शक्ती काय आहे  



        आपल्याला माहित आहे का आपल्या शरिरात एक अशा प्रकारची लुप्त शक्ति आहे. त्या शक्तिच्या साहाय्याने आपण काहीहि करु शकतो त्या शक्तिचा वापर करुन अशक्य गोष्ट सुधा शक्य करु शकतो जी शक्ति संपुर्ण ब्रमांडमधे आहे तीच शक्ती आपल्या पिंडात सुधा असते. ति शक्ति म्हणजे कुंडलिन शक्ति. हि शक्ति आपल्या शरिरात जागृत नसते. पण आपण हि शक्ति आपल्या शरिरातील सात चक्रांच्या साहाय्याने सक्रिय करुन हि शक्ति जागृत करु शकतो. कुंडलिन शक्ति हि अशा प्रकारची शक्ति आहे कि ती जागृत केल्यावर आपण मानव वरुन महामानव बनु शकतो. आपल्या शरिरात अशी असीम व दिव्य शक्ति निर्माण होते कि त्या शक्तिचा आपण विचार सुधा करु शकत नाहि. हि शक्ति जर जागृत झाल्यावर आपल्या संपुर्ण शरिरावर व इंद्रियांवर अधिकार प्राप्त करु शकतो. काम, क्रोध, मोह, मत्सर, यांच्यावर आपण नियंत्रण ठेवु शकतो. जर कुंडली शक्ति जागृत झाली तर आपल्या जिवनात अनेक प्रकारचे बदल घडुन येतात हि उर्जा कमरेच्या खालच्या मुलाधार चक्रातुन व शरिराच्या वरच्या मस्तकातिल सहस्रार चक्रापर्यंत जाउन पोहचते.


कूंडलिन शक्ति कशा प्रकारे जाग्रुत केली जाते


कुंडलिन शक्ति हि जो पर्यंत जाग्रुत होत नाहि जो पर्यंत आपल्या शरिरातिल सात चक्र हे सक्रिय होत नाहि. व हे सात चक्र हि आपण योग व योगासनाच्या साहाय्याने सक्रिय करु शकतो. हे चक्र अजुन एका प्रकारे जागृत करु शकतो ते म्हणजे मेडिटेशन करुन म्हणजेच ध्यान लावुन किंवा तप, मुद्रा, भक्ति, ज्ञान, प्राणायाम, याच्या सहाय्याने चक्र सक्रिय केले जाते किंवा करु शकतो.


आपल्या शरिरातील सात चक्र :- 

1) मुलाधार चक्र 
2) स्वाधिष्टान चक्र
3) मणिपुर चक्र
4) अनाहत चक्र
5) विशुद्ध चक्र
6) आज्ञा चक्र 
7) सहस्रार चक्र 
            जर आपल्याला कूंडलिन शक्ति जाग्रुत करायची असेल तर इडा, पिंगला, सुषुम्ना या नाडयांना शुद्ध केले पाहिजे, व यासाठि आपल्याला प्राणायाम करण्याची गरज आहे, प्राणायाम हा एकमात्र योग आहे जो आपल्या शरिरातील अनेक नाड्यांना शुद्ध करते. या शक्तिचा स्र्तोत हा मुलाधार चक्रापासुन निर्माण होतो.

1 1)  मुलाधार चक्र : (root chakra) 
   
                 कुंडलिन शक्तिचा स्रोत हा मुलाधार चक्रापासुन निर्माण होतो. हे चक्र आपल्या कमरेच्या खाली गुद्दद्वाराच्या जवळ स्थित असते हे चक्र आपल्याला निसर्गाने जन्मताच सक्रिय करुन दिले गेले आहे. पण त्या चक्राला संतुलित करण्याचे काम हे आपले असते. जर आपले मुलाधार चक्र हे संतुलित असेल तर आपल्या जिवन हे सुखमय होईल. आपल्याला नवनविन काहि तरि करण्याचि संधी मिळेल. हे चक्र आपल्या शरिरामधे संतुलित आहे कि नाहि हे कसे ओळखावे जर आपल्या जिवनात ताणतणाव आहे किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टिवर जर जास्ता पॅनिक होत असेल किंवा आपल्यामधे आत्माविश्वासाचि कमतरता जाणवायला सुरवात होत असेल आपण स्वताला इतरांपासुन वेगळे समजु लागलो तर समजुन जायचे कि आपले मुलाधार चक्र हे असंतुलित आहे. हे चक्र जागृत करण्यासाठि ध्यान लाऊन (लं) मंत्राचा उच्चार केला पाहिजे. हे मंत्राचा जर आपण दररोज जप केले तर आपला मुलाधार चक्र हे पुर्णपणे संतुलित होवु शकतो. व आपल्या जिवनात व आपल्या मधे अनेक प्रकारचे बद्ल दिसुन येतील
   
  2)  स्वाधिष्टान : (sacral chakra)
  
               स्वाधिष्टान चक्र हे आपल्या शरिरातील दुसरे चक्र आहे हे चक्र आपल्या पोटाच्या नाभिच्या जरा खालचे चक्र आहे. या चक्राचा रंग हा नारंगी आहे स्वाधिष्टान चक्र हे पुर्णपणे सक्रिय झाले तर आसपासच्या सर्व अवयवांना निरोगी ठेवते. जर स्वादिष्टान चक्र हे संतुलित असेल तर आपल्याला नविन काहि तरि करण्याची प्रव्रुत्ति आपल्या मनात जागते आपला आत्मविश्वास वाढतो हे चक्र जागृत आहे कि नाहि हे कसे ओळखता येते, जर आपले शरिर हे छोटे छोटे काम करुनहि  थकत असेल किंवा आपल्यामधे सारखे आजार निर्माण होत असेल किंवा आत्माविश्वासाचि कमतरता भासत असेल. एखाद्या गोष्टिवर ठाम न राहणे, असे प्रकार आपल्या मध्ये दिसून येतात, जर हे चक्र संतुलित करायचे असेल तर प्रथमता आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे योग व योगासन केले पाहिजे हे चक्र जागृत करण्यासाठि नटरासन हे आसन खुप उपयोगी आहे. योग ध्यान लावुन हे चक्र आपण संतुलित करु शकतो जेव्हा आपण हे चक्र जागृत करु तेव्हा आपले सर्व ध्यान हे जिथे स्वाधिष्टान चक्र आहे तिथे असले पाहिजे
  
  3)  मणिपुर चक्र : ( navel chakra)
   
                मणिपुर चक्र हे सक्रिय झाल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे देते. हे चक्र आपल्या नाभिच्या येथे स्थित असते. मणिपुर उर्जा चे तत्व हे अग्णी आहे. या चक्रा चा रंग हा पिवळा आहे. हा चक्र संतुलित केला तर आपल्या मनामधिल भिति हि निघुन जाते, आपण सर्व काही प्राप्त करण्याचा आत्मविश्वास आपल्या मधे जागा होतो. हे चक्र सक्रिय केल्यावर आपण भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज अगोदरच लावु शकतो. आपल्या जिवनात सुख व आनंद निर्माण होतो. हे चक्र सक्रिय केल्याने आपल्या मधे अनेक प्रकारचे बदल होताना दिसु लागतात. (रं) या मंत्राचा वापर करुन चक्र सक्रिय केले जाते हे चक्र सक्रिय करण्यासाठि आपण उत्तरेला तोंड करुन जमिनिवर बसुन हाताची बोट मुद्रा अवस्थेत ठेवुन (रं) मंत्राचा वापर करुन हे चक्र सक्रिय केले जाते

  4)  अनाहत चक्र : (heart chakra) 
  
                अनाहत चक्र हे आपल्या ह्दयापाशी असते. हे चक्र वरुन तीन चक्र व खालिल तीन चक्राच्या मधोमध असते. हे चक्र जागृत झाल्यावर पुर्थिवर आपले काहि तरि अस्थित्व असल्याची जाण येते. अनाहत चक्र हे आपल्या ह्दयापाशी असल्यामुळे आपल्या मनात एखाद्या व्यक्तिविषयी किंवा इतर गोष्टिविषयी प्रेम भावना निर्माण होते. या चक्राचा रंग हा हिरवा आहे. जर हे चक्र सक्रिय असेल तर आपन कोणत्याही व्यक्तिशी प्रेमाने वागतो. तुम्हाला माहित आहे का आपण एखाद्या व्यक्ति किंवा युवतीवर एवढे प्रेम करतो कि त्या प्रेमापोटि कोणतिहि अशक्य गोष्टि हि शक्य करु शकतो. अनाहत चक्र हे संतुलित झाले तर आपले क्रोधावर पुर्णपणे संतुलन व नियंत्रण ठेवु शकतो. आपण जो पर्यंत खालचे चक्र पुर्णपणे संतुलित करत नाहि. तो पर्यंत हे चक्र संतुलित करु नये नाहितर याचे आपल्याला भरपुर नुकसान होईल. हे चक्र संतुलित करण्यासाठि जमिनिवर बसुन मुद्रा अवस्थेत बसावे आणि (यं) या मंत्राचा जप करावा.

  5)  विशुध्द चक्र : (throat chakra)
  
                विशुद्ध चक्र हे आपल्या गळ्याच्या(कंठाच्या) दिशेला स्थित असतो. विशुध्द चक्र हे सोळ पाकळिचे प्रतिक मानले जाते. जर हे चक्र सक्रिय केले तर आपल्या मुखातुन कधिच असत्य शब्द निघणार नाही. आपल्या मुखातुन  दरवेळेला सत्य वचन निघेल, आपण इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधायला लागतो. या चक्राचा अजुन एक फायदा असा आहे कि आपण तहान भुक वर विजय मिळवु शकतो अथवा संय्यम ठेवु शकतो. आपण अनेक कलागुणांमधे खुमारत प्राप्त करु शकतो. हे चक्र संतुलित झाल्यावर आपली पाचन संस्था चांगली राहते. हे चक्र पुर्णपणे संतुलित झाल्यावर विषारी पदार्थ व हवा हे आपल्या शरिरात येवुन शुद्ध होतात व आपल्या शरीराला कोणताहि धोका निर्माण होत नाहि. या चक्रामुळे अनेक शक्तिचा संचार आपल्या मधे होतो. हे चक्र संतुलित करण्यासाठि प्रथमता आपण जमिनिवर मुद्रा अवस्थेत बसुन (हं) या मंत्राचा जप करुन हे चक्र सक्रिय केले जाते.

  6)  आज्ञा चक्र : (eyebrow chakra)
  
               आज्ञा चक्र हे आपल्या दोन्हि भुवयांच्या थोडया वरती असतो. आज्ञा चक्र हे इतर चक्रापेशा भरपुर महत्वाचे व शक्तिशाली चक्र आहे. आज्ञा चक्राला मानवाचा तिसरा डोळा सुधा म्हणतात. हे चक्र जाग्रुत करण्यासाठि भरपुर मेहनत घ्यावि लागते, ज्याचे आज्ञा चक्र जाग्रुत होते त्याला संपुर्ण विश्वाचे ज्ञान हे आत्मासात होते, त्याच्या साठि जगातील कोणतिहि गोष्ट अशक्य राहत नाहि. ज्याचे हे चक्र सक्रिय झाले तर तो दिव्यपुरुष बनतो भुत आणि भविष्यावर त्याचे संतुलन राहते. हे चक्र सक्रिय करण्यासाठि भरपुर परिश्रमाची गरज आहे. हे चक्र सक्रिय करण्यासाठि प्रथम जमिनिवर उत्तरेला तोंड करुन बसुन मुद्रा अवस्थेत रहावे. व आपले दोन्हि डोळे बंद करुन जिथे आज्ञा चक्र आहे तिथे आपले ध्यान घेऊन जावे. व () या मंत्राचा जप करावा.

   7) सहस्रार चक्र : (crown chakra)  
   

                   सहस्रार चक्र हे कमळाच्या हजार पाकळांचे प्रतिक मानले जाते. या चक्राच्या साहाय्याने आपण परमात्माशी मिलन करु शकतो. आपल्या डोक्याच्या शिखराशि हे चक्र स्थित असते म्हणजेच जिथे आपली टाळु आहे तिथे. जर हे चक्र पुर्णपणे जाग्रुत झाले तर आपण संपुर्ण शरिरावर विजय प्राप्त करु शकतो. या चक्राने मानवाच्या जिवनात अनेक प्रकारचे बदल घडुन येतात. संपुर्ण ब्रमांडाचे रहस्य समजण्यास सक्षम होतो. हे चक्र योग व योगासनाच्या सहाय्याने सक्रिय केले जाते. शिरषासन हे आसन चक्र जाग्रुत करण्यासाठि भरपुर महत्वाचे आहे शिरषासन असे एकमात्र आसन आहे जे सहस्रार चक्रा पर्यंत लवकर उर्जा पोचवण्याचे काम करते. हे चक्र जाग्रुत करण्यासाठि साधु संताना किति तरी वर्ष लागतात. पण हे चक्र कमी प्रमाणात सक्रिय झाले तरी सुधा आपल्याला याचा भरपुर लाभ मिळतो. 

   कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी आपण गुरु च्या सानिध्यात राहूनच करावें. गुरु आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतो.     

  
  
  






















.