![]() |
Hair Loss Problems |
आजकालच्या काळात फार मोठ्या प्रमाणात केसांच्या नव नविन Hair Style मुल व मुली करत असतात. तसे पण केसांची Hair Style करणे कोणाला आवडत नाहि सगळ्यांनाच आवडते. पण काहि लोकांचे अथवा मुला मुलिंचे केस गळण्या बद्दल ची समस्या हे दिवसांदिवस वाढत जात आहे. मुलांची वयाची १८ वर्षांपासून केस गळण्यास सुरवात होत आहे हे दिसून आले आहे. ते केस गळणे व कमजोर
होण्यामागचे नेमके कारण काय आहे, त्याच्यावर काय उपाय योजना करुन केस गळने थांबवले पाहिजे. हे आपण जाणुन घेणार आहोत.
हेअर लॉस होण्याचं पहिल कारण म्हणजे टेन्शन या गुंतागुंतीच्या जीवनात जर आपण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टि बद्दल टेन्शन घेत बसलो तर त्याचा परिणाम आपल्या डोक्याच्या केसावर होतो. आपले केस हे जास्त गळण्याची शक्यता आपल्याला दिसून येते त्यामुळे आपण कोणत्या हि गोष्टिचे टेंन्शन न घेता आपल्यात आत्मविश्वास कसा वाढेल याच्या कडे लक्ष दिले पाहिजे. जर आपण तुळशीची पानाचे सेवन केले तर आपल्या मध्ये सकारात्मक विचाराची पैदास होते.
आंघोळ करताना आपण जास्त डोक्यावर गरम पाणी टाकु नये त्यामुळे आपली केस पातळ होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे जर मुलांचे केस गळत असेल तर मुलांने आंघोळ करताना दररोजपणे शांपुचा वापर करु नये शांपुचा वापर करावा पण तो आठवड्यातुन दोन वेळा किंवा तीन वेळा करावा पण दररोज करु नये. शांपूचा वापर जास्त केल्याने केस हि भरपूर पातळ होऊन गळू शकतात.
औषधांचा जास्त वापर होणे :-
केस गळण्यामागचे हे एक कारण आहे की आपण जर आजारी
असलो किंवा आपण कोणत्याना कोणत्या कारणामुळे जर आपण जास्त strong औषध घेत असलो तरी सुद्धा आपली
केस गळुन कमजोर होण्याचि शक्यता असते. त्यामुळे जास्त strong औषधाचा वापर कमी करावा
जर औषधांचा वापर कमी करणे शक्य नसेल तर आपण खालील दिलेले तथ्य पाळावे.
आजकालच्या काळात मुलमुली मोबाईल, संगणक, टिव्हि बघणे याचा वापर दिवस दिवसभर करत असतात. याच खरं कारण असे आहे की मोबाईल व टिव्हि हे जास्त जवळुन बघत बसल्याने किंवा इतर तांत्रिक गोष्टिचा वापर
जास्त प्रमाणे केल्याने त्याच्यातुन निघणारे रेडीएशन किरणे
याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो व त्याचा परिणाम आपल्या डोक्याच्या केसांवर
होतो त्यामुळे केसांची मुळे हि कमजोर होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिथके होईल तिथके तांत्रिक वस्तू पासून लांब रहावे.
आपल्याला जर चांगली झोप लागत नसेल अथवा कमी झोप लागत असेल तर त्याचा परिणाम आपल्या केसांना होतो आपल्याला रात्रिचि कमीत कमी सात तास तरी आपली झोप झाली पाहिजे असे नाहि कि आपण दिवसभर जावुन बेड वर झोपले पाहिजे रात्रिचि आपल्याला चांगली झोप लागली पाहिजे रात्रिचा जास्त मोबाईल चा वापर करणे टाळला पाहिजे मोबाईल मुळे आपल्याला चांगली झोप लागत नाहि व रात्रिचा झोपताना आपला मोबाईल आपल्या शरीरापासुन व डोक्यापासुन लांब ठेवावा जेणेकरुन आपल्याला चांगली झोप लागेल.
आपल्या डोक्याची जर केस गळायला लागली तर आपण त्याच्या बद्दल सारख विचार करत राहतो त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येतात त्यामुळे आपली केस हे अजुन कमजोर होऊन जास्त गळायला लागतात. जर आपण दररोज शांतपणे दहा पंधरा मिनिटे बसुन ध्यान लावला
व वेगवेगळ्या प्रकारचे आपण आसने केली तर आपल्या मनात सकारात्म विचार येतात व आपल मन सुधा शांत राहते. व
आपण केस गळणे व कमजोर होणे याच्यावर Control करु शकतो
नारीयल तेल लावणे :-
नारियल तेल हे आपल्या केसांसाठि आवश्यक आहे जर केस गळण्यापासुन थांबवायचे असेल तर आठवड्यातुन तीन चार वेळा रात्रिची नारियल तेलाने डोक्याची हळुवार हाताने डोक्याचि मालिश केली पाहिजे त्यामुळे आपल्या केसांच्या मुळाना ते तेल लागेल. व त्यामुळे आपली केस हि दाट व strong होत जातात.
कडिपत्ताचा वापर व आवळ्याचा रस पिणे :-
जर आपले केस जर कमजोर होत गेले असेल तर आपल्या जेवणात कडीपत्ता चा वापर असणे गरजेचे आहे कडिपत्ता हा आपल्या केसासाठि भरपुर उपयोगी आहे कडिपत्ता मधे जे गुणधर्म आहे ते आपल्या केसासाठि उपयोगी आहे. दुसरी गोष्ट
म्हणजे आपण आवळ्यांचा ज्युस करुन पिला पाहिजे त्याच्यात सुधा अनेक गुणधर्म आहेत व
ते आपल्या केसांसाठी उपयुक्त आहेत.
अशा प्रकारे हि
तथ्य जर आपण पाळली तर आपण आपली डोक्यावरची केस हि गळण्यापासुन थांबवु शकतो व दाट व
मजबुत बनवु शकतो.
1 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box