झाडांचा दिवसेंदिवस होणारा घट
नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक पर्यावरण दिना निमित्त झाडांचे होणारे कमी प्रमाण या विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यावर निबंध व झाडांचे मनोगत व्यक्त करणार आहोत.
प्रामुख्याने पहिले गेल तर आजच्या
युगात झाडांचा मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसत आहे. आज आपण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झाडां विषयी सांत्वन व्यक्त करणारं आहोत. झाड हे मानव जातीसाठी च नाही
तर संपुर्ण सजीव सृष्टिला जीवन जगण्यास फार मोठे योगदान देत असते. या झाडांन मुळेच
संपुर्ण सृष्टी जीवीत आहे. आपण विचारच करु शकत नाही की झाडे नसती तर काय झाले असते. या विषयी आपण पुढे निबंध पाहणार आहोत. या
झाडांमुळेच तर या पृथ्वीचे अस्तित्व ठिकून आहे, नाही तर ही संपुर्ण पृथ्वी ही ओसाड पडली असती
आपल्याला माहीत आहे
का या जगात ऑक्सीजनचे प्रमाण हे कमी आणी दुषित होत चालले आहे. या मागचे कारण म्हणजे
झाडांची मोठ्याप्रमाणात होणारी कत्तल या जगात एका मिनिटाला अरबों पेक्षा जास्त झाडे
तोडली जातात. माणुस आपल्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड करत चालला आहे. या
जंगलतोडामुळे दुर्मीळ प्रजतीचे असणारे प्राणी हे संपुर्ण पणे नष्ट झालेले आहेत. जे
प्राणी राहिले आहेत ते जंगल सोडुन जंगलाच्या बाहेर येवुन शहरी भागात वावरत राहत आहेत.आणि तेच प्राणी माणसांना दिसल्यावर त्या प्राण्यांना प्राणी संग्रालयात नेवून सोडतात किंवा त्यांना मारून टाकतात. आणी ही चुकी फक्त झाडे तोडणा-याची नाही तर
संपुर्ण मानव जातीची आहे. माणसाच्या गरजा एवढा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की त्याचा
आपण अंदाज सुधा लावु शकत नाही. एकीकडे आपण बोलतो की झाडे लावा झाडे जगवा आणी दुसरी
कडे त्याच झाडांपासुन बनलेल्या खुर्ची, सोफा, टेबल, वह्या. यांपेक्षाही जास्त वस्तुंचा
आपण वापर करून औद्योगीकीकरण करण्यासाठी जंगलाची तोडणी करत आहोत.
जर झाडे नसती तर अथवा झाडे गायब झाली तर:
आपण कधी असा विचार केला आहेत. जर झाडे नसती तर काय झाले असते. महत्वाचे म्हणजे झाडे नसते तर संपुर्ण सजीव सृष्टिला ऑक्सिजनच भेटले नसते.या कारणाने संपुर्ण मानवजातीचा नाश झाला असता. आपण असं सुधा समजुया की मानवजातीने जीवन जगण्यासाठी जर दुस-या पर्यायाचा वापर केला. तरी झाडांचा उपयोग हा मानव जातीला भासलाच असता. कारण झाडे हि माणसांना प्राण्यांना फक्त ऑक्सिजनच नाही तर वाढत्या तापमानापासुन वाचवते त्यांना सावली देते. त्यांना फळ, फुल देते. झाडे नसतील किंवा झाडे गायब झाली तर माणुस हा वाढत्या तापमाणानेच मरुन जाईल. माणसांचा संपुर्ण उदरनिर्वाह या झाडांमुळेच होतो. झाडे नसतील तर त्यांना खायला काहीही भेटनार नाही. झाडे नसल्याने संपुर्ण पृथ्वीचे ऋतुमान हे कोलमोडुन जाईल.
तुम्हाला माहीत आहे का ज्या ठिकाणी झाडांची कमतरता आहे त्या ठिकाणी पावसाची सुधा कमतरता आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई कमी होईल. झाडे नसती किंवा गायब झाली तर सगळे मातीचे दगडाचे डोंगर हे कोसळुन पडतील. याचे मागचे कारण असे आहे की, झाडे ही माती धरुन ठेवतात. तुम्ही डोंगर घसरुन पडण्याची बातमी हि ऐकलीच असावी, कारण डोंगर घसरुन पडण्याच्या मागची कारणे म्हणजे मोठ्या प्रमाणात तोड्ले गेलेली झाडे आहेत. जर झाडे गायब झाली तर मानव जातीला प्लास्टिक, लोह यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागेल जर झाडेच नसतील तर त्यांच्या पासुन बनणा-या वस्तुंचा वापर आपण करु शकत नाही. झाडे जर गायब झाली तर या जगात मोठ्या प्रमाणात प्रदुषणचे प्रमाण वाढेल, आणी वाढत्या प्रदुषणामुळे मानवाच्या व इतर सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. जर झाडे गायब अथवा नसती तर या सगळ्या संकटाला सामोरे जावे लागले असते.
झाडाचे मनोगत
मला ओळखल का. मी एक
झाड आहे. तेच झाड जे तुम्हाला अनेक संकटापासुन वाचवते, मी तेच झाड आहे, जे मरुनही तुमच्या
उपयोगी येते. मला मारुन तुम्ही माझ्या सर्व घटकांपासुन वस्तु बनवुन सर्वजण त्याचा लाभ
घेतात. मी एक झाड, तुमच्या साठी मी काय नाही केले. जर तुम्हाला भुक लागली की मी तुमची
भुक मिटवते. तुम्हाला जर ऊन लागली की आईच्या मायेसारखे तुम्हाला मी खुशीत घेते. या
जगातली सर्व घाण-कचरा मी माझ्या मधे सामवुन तुम्हाला चांगले ऑक्सिजन देते. तुम्हाला
मी धान्य, फळ, फुले, तुमच्या गरजा भागवणारी सर्व सुविधा मी देते. तरी सुधा तुम्ही मानव
माझ्या जीवावर का उठला आहात.?
माझ्या मुळेच तर हे
जग ठिकुण आहे. माझ्या आस्तित्वानेच तुमचे अस्तित्व आहे. तरी सुधा तुम्ही मला या जगातुन
का कमी करत आहात ? स्वत:च्या स्वार्थासाठी मला मारण्याचे प्रमाण तुमचे दिवसांदिवस वाढतच
चालले आहे. तुम्ही माझ्या बरोबरच त्या निष्पाप प्राण्यांचा-पक्ष्यांचा सुधा जिव घेत
आहात, जे माझ्या आश्रयाखाली वेळ घालवतात. जर माझ संपुर्ण अस्तित्व नष्ट
झाले तर या निसर्गाच संपुर्ण चक्र बदलुन जाईल. सर्व जागी भुकंप, वादळे, निर्माण होतील.
त्यांच्या पासुन तुमचे कोण रक्षण करेल. तुम्हाला कोण आसरा देईल. तुम्हांला प्रदुषणापासुन
कोण वाचवेल? याचा तुम्ही कधी विचार तरी केला आहात का. जर माझे प्रमाण कमी झाले तर तुमचे
सुधा प्रमाण कमी होईल. जर मी नष्ट झालो तर तुम्ही मानवच नाही तर संपुर्ण सजीव सृष्टी
नष्ट होईल. आणी या मागे जबाबदार फक्तनं-फक्त तुम्ही मानवच असाल.
झाडे वाचवा घोषवाक्य :
1) झाडे जगवा जीवन वाचवा.
2) जग हिरवगार होईल तेव्हाच
मन शांत-निर्मळ राहील.
3) झाडे लावा झाडे जगवा.
4) एक झाड हजारोंकी जान.
5) जो देतो झाडाना पाणी
तोच व्यक्ती ज्ञानी.
6) पाणी जिरवा झाड वाढवा.
7) हरीत राष्ट्र स्वच्छ
राष्ट्र.
8) झाड लावा पृथ्वी जगवा.
9) झाड नष्ट होण्यापासुन
वाचवा आपला फर्ज निभवा.
10) जिथ हरीयाली तिथ खुशयाली.
11) झाडाची रक्षा भविष्याची
सुरक्षा.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box