World health day  जागतिक आरोग्य दिन

        आरोग्य हा मानवाचा मुलभुत अधिकार मानला गेला आहे. जागतिक आरोग्य दिन म्हणजेच WHO (World Health Organization) हा सात 7 एप्रिला साजरा केला जातो. या संघटनाची खरी सुरवात (बैठक) 73 वर्षाअगोदर 1948 ला सुरु झाली होती. 1950 रोजी सर्व देशभरात जागतिक आरोग्य दिन म्हणुन साजरा केला गेला होता. या संघटनाच्या मागे अनेक देशांचा पाठींबा आहे. हि संघटना सुरु करण्यामागचे कारण म्हणजे जगभरात वाढणा-या रोगराई आजारांवर मात करणे आणी प्रत्येक देशामधुन रोगराई नष्ट करणे होय. पण आज संपुर्ण देशातच नाही तर जगभरात कोरोनाचे सावट पडले आहे. या रोगाने अनेक माणसांचा जीव सुधा घेतला आहे. या विषाणु पासुन संपुर्ण जग कस मुक्त होईल हेच या WHO आरोग्य संघटनाचे उद्देश आहे. देशाला या विषाणु पासुन आझादी मिळवण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, परिचारक हे आपले जिवाचे रान करुन पेशंटचा जीव वाचवत आहे. कित्येक डॉक्टर हे आपल्या परिवारापासुन दुर राहुन या रोगापासुन माणसांचे जिवन वाचवत आहे. म्हणुन जागतिक आरोग्य दिन हा दिवस डॉक्टर, नर्सेस, असे अनेक समाजसेवकांसाठी समर्पित केला गेला आहे. WHO ने जागतिक आरोग्य संकट म्हणुन कोविड 19 या विषाणुला घोषित केले आहे. आणि जगभरात या कोविड 19 चे वॅक्सिन बनवण्याचे कामकाज हे अजुनही चालु आहे.


जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे व कोणत्या देशात आहे?

    जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे स्विझर्लेंण्ड देशातील जिनिव्हा शहरात आहे. 7 एप्रिल 1948 ला या समितीची स्थापना करण्यात आली होती. या संघटनेमध्ये 193 देशांच्या स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या. या संघटनेत पोलिओ, मलेरीया, एड्स सारख्या अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले होते. आजच्या वेळी कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी करण्याचे उपक्रम WHO मार्फत चालु आहे.


जागतिक आरोग्य दिन थीम 2021

(Together for a fairer, healthier world) एकत्र एक सुसंस्कृत, निरोगी जगासाठी याचा अर्थ असा आहे की, असमानता दुर लोटुन आणी सर्वांचे आरोग्य चांगले होण्यासाठी कृती एकत्रित करण्याचे आणि कोणालाही मागे न ठेवण्याचे आवाहन करते. 


 आपण आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे

1. कोरोनाचा प्रादुर्भाव बघुन सर्वप्रथम आपण घरी राहुन हा दिवस साजरा करावा. कुठे जायचे असेल तर मास्क घालुनच जायचे.

2. आपण आपल्या हेल्थ चा विचार करुन आपण दररोज योग्य व चांगला आहाराचे सेवन करावे.

3. जागोजागी सेनिटाझरचा वापर करावा.

4. आपण आपले मन हे स्थिर व आत्मविश्वासु सकारात्मक विचारांचे ठेवावे, जर मन हे चांगले असेल तर आरोग्य हि चांगलेच राहते.

   6. वेगवेगळ्या प्रकारचे आसन करुन आपण आपल्या शरीराला निरोगी ठेवु शकतो.

7. आपण सगळ्यांनी अशी संकल्पना घ्यावी की कमीत कमी गाड्यांचा वापर कसा होईल याचा विचार करावा. याच्या मुळे आपले आणी इतरांचे आरोग्य चांगले राहील.

8.  लवकर उठुन नेहमीतपणे व्यायाम करणे.

9. गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळणे.

10. बाजारातुन आणलेले फळ भाजी यांना स्वच्छ हात धुवुन आणावे.

11. जास्तीत जास्त कडधान्य पालेभाज्या यांचा सेवन करणे गरजेचे आहे.

12. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झोपावे आणी सकाळी लवकर उठावे.

जर तुम्हाला खोकला, ताप यासारखे जर घटक आपल्या शरीरामधे आढळुन आले तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अशा प्रकारे आपण आपली व आपल्या परीवाराच्या आरोग्याची काळजी घेवु शकतो. आणी त्यांना कोरोनापासुन दुर ठेवु शकतो. 


आरोग्य दिनाविषयी काही घोषवाक्य :

  1. मन निरोगी तर शरीर निरोगी
  2.   ज्याचे शरीर निरोगी सुखी, नाहीतर दुखी
  3. व्यायाम करुन रोग पळवा स्वस्त सुंदर शरीर मिळवा
  4. स्वस्त राहिल तन तर स्वस्त राहील मन
  5. आरोग्य दिना दिवशी हेच आहे बोलण, हेच अपेक्षा आहेत की तुम्ही स्वस्थ व सूदृढ राहणं
  6. जो दररोज करतो योग त्याच्यापासुन दुर राहतात रोग
  7. हजार रोगांची एकच दवाई आपल्या परीसराची असावी सफाई
  8. जर जीवनात होयचे असेल हिट तर रहा एकदम तंदुरुस फिट
  9. जीवनच आहे आपला रोल स्वास्थ राहणं हेच अनमोल
  10. व्यायामाचा वसा धरु नाहीतर आजार होतील सुरु.