नागपंचमी साजरा करण्याबाबतचे महत्व


                              हिंदु धर्मात नागाला भरपुर महत्व दिले गेले आहे. नागपंचमी हा सण संपुर्ण भारतात साजरा केला जातो. नागपंचमी हा दिवस भरपुर शुभ मानला जातो. हा सण श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमिला साजरा केला जातो. हा श्रावण महिन्यातिल पहिला सण सुधा मानला जातो. या दिवशी घरातील महिला या शेणाचा नाग किंवा मातिचा नाग तयार करुन त्याचि पुजा करतात.  त्याच्या समोर दुध प्रसाद ठेवतात. काहि महिला या घराच्या बाहेर पडुन नागाच्या वारुळाची पुजा करतात. हा सण मोठ्या प्रमाणे साजरा करतात. या दिवशी महिला इतर कोणिहि नागदेवताकडे कोणतीहि मनोकामना व्यक्त केली तरि ती पुर्ण होते असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी कोणिहि शेताची कामे करत नाहि नाहि कोयता किंवा नांगराचा वापर करत. याच असं कारण आहे कि नागपंचमिचा दिवस हा नागासाठि भरपुर महत्वाचा असतो. या दिवशी सगळे नाग हे बाहेर पडतात असे मानले जाते. त्यांना या दिवशी कोणतिहि इजा होऊ नये म्हणुन शेतीची कामे कोणिहि करत नाहि. उलट नाग हा शेतकर्याचा मित्र मानला जातो जे किडे किंवा उंदिर पिकांची नासधुस करतात त्या उंदिर किड्यांना साप खाऊन शेतकरांच्या पिकांचे नुकसान होण्यापासुन वाचवतो. या नागपंचमी च्या दिवशी घरात चांगले गोड लाडु इतर पंचपक्वान सुधा केले जाते या दिवशी महाराष्ट्रियन स्वादिष्ट पदार्थ पुरणपोळि सुधा केली जाते नागदेवाला निवेद केला जातो. नाग देवाचा उल्लेख अनेक हिंदु धर्माच्या ग्रंथ मधे केला गेला आहे.  शिव शंकराच्या गळ्यात सुधा नाग आहे संपुर्ण नागलोक हे शंकराचे भक्त आहे श्रीविष्णु च्या डोक्यावर सुधा नाग हा पाच फणा काडुन असतो. नागपंचमिच्या दिवशी शंकराचे देवस्थान काशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागदेवाची पुजा केली जाते त्याला दुध दिले जाते. टिप : शास्त्रज्ञ असे म्हणतात कि जे आपन नागाला किंवा इतर सापाला जे दुध देतो ते त्यांच्यासाठि धोकादायक असतो कोणताहि साप किंवा नाग हा दुध पित नाहि. हिंदु धर्मात नागाला स्त्रिंया भाऊ मानतात. नाग पंचमीच्या दिवशी आपला भाऊ म्हणुन नागाची पुजा करतात. 

नागपंचमी हा सण साजरा करण्यामागचि कथा :


              एके दिवशी एक शेतकरी शेतात नांगर फिरवत असताना तीन नागाच्या पिल्लांवर चुकुन नांगर घालतो   नागाचि पिल्ल हि नांगरा खालि येऊन मरुन जातात. आपली पिल्ल मेल्याने नागाला खुप राग येतो. तो नाग रात्रिचा जाऊन शेतकऱ्याच्या पुर्ण परिवाराला चावतो.  शेतकऱ्याचा पुर्ण परिवार हा मरुन जातो पण शेतकऱ्याचि मुलगी फक्त जिंवत राहते.  शेतकऱ्याच्या मुलिला समजते कि आपल्या परिवाराला एका सापाने चावले आहे. त्या नागाला सुधा समजते कि शेतकऱ्याचि मुलगी अजुन जिवंत आहे  नाग हा परत दुसऱ्या दिवशि तिला चावायला जातो. तिथे गेल्यावर शेतकऱ्याची मुलगी हि नागासाठि दुध गोड पदार्थ तयार करुन ठेवते, नागाला म्हणते कि हे नागदेवता जे माझ्या परिवाराकडुन जे पाप घडल आहे त्याच्या बद्द्ल मला माझ्या परिवाराला क्षमा करावी.  ती मुलगी नागाला चांगला खायला पेयायला देते  हे बघुन नाग देवता हा तिच्यावर खुप खुष होतो. तिला आशिर्वाद देतो कि तुला काय पाहिजे ते सांग, मी तुझी मनोकामना पुर्ण करीन या दिवशी जो कोणी माझी पुजा करिल त्याचि सुधा मी मनोकामना पुर्ण करिन असे बोलुन नागदेव हा तिच्या परिवाराला पुन्हा जिंवत करुन निघुन जातो. याच्या नंतर नागपंचमिचा सण हा साजरा केला जातो. म्हणुन या दिवशी कोणिहि शेतिचि कामे करत नाहि

                          या मागची अशी सुधा कहानी मानले जाते कि श्रीकृष्णाने श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमिच्या
 दिवशी कालया नागाचा मर्दन केले होते त्यामुळे सुधा नागपंचमि हि साजरी केली जाते.

नागपंचमि सण कशा प्रकारे साजरा केला जातो.


                       दर्शिकामधे दिलेल्या कालावधी मध्ये नागपंचमीची पुजा केली जाते. या दिवशी घराची संपुर्णा स्वच्छता केली जाते. घर अंगण शेनाने सारवले जाते. त्या नंतर नागाची मुर्ति तयार केलि जाते त्याचि पुजा केलि जाते. घरात गोड पक्वान तयार केले जाते. महिला या दिवशि नविन साडि घालुन दागदागिने घालुन नागाची पुजा करतात.  नागाला दुध ल्हायांचा प्रसाद दिला जातो. त्याचि ओवळणि केलि जाते या दिवशि महिला या नागाची आरती किंवा ओव्या गातात आपल्या मनातील मनोकामना व्यक्त करतात.  

नागपंचमी हि श्रावण महिनेंच्या शुद्ध पंचमीला २७ जुलैला शनिवारी  साजरी केली जाणार आहे