गुरुपौर्णिमा का व कशाप्रकारे साजरि केली जाते.?

                                       

                          गुरुपौर्णिमा हि 5 जुलै 2020 आषाढि महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेलाच गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. हि पौर्णिमा साजरा करण्याबाबत चे कारण असे आहे कि या दिवशी असा एक थोर मनुष्य ज्यांनी संपुर्ण महाभारत लिहले, अनेक प्रसिद्ध ग्रंथ लिहले व ज्यांनी पाच तत्वांची निर्मिती केली ते म्हणजे महर्षि व्यास मुनी. यांचा जन्म या दिवशी झाला होता. महर्षि व्यास यांनि आपल्या जिवन किर्तिमधे जगाच्या फायद्यासाठि अनेक कामे केली.  गुरुपौर्णिमा या दिवशी महर्षि व्यास यांचि पुजा केली जाते व त्यांना पुजले जाते. हा दिवस प्रत्येक गुरुंसाठि खुप मोठा असतो. या दिवशी सगळे शिष्य व विद्द्यार्थि आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा किंवा भेट देतात. हा दिवस विद्धार्थांसाठि सुधा फार महत्वाचा असतो ते सुधा या दिवसाचि आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशि प्रत्येक शिष्य आपल्या शिक्षकांसाठि शुभेच्छा व कार्यक्रम सुधा आयोजित करतात व त्यांना नमन करतात. काहि ठिकाणि गुरुपौर्णिमा हि मोठ्या प्रमाणे साजरी केली जाते व त्यांचा आदर केला जातो.


  गुरूब्रम्हा गुरर्विष्णुगुरू र्देवो महेश्वर:  गुरू साक्षात परब्रम्हःतस्मै श्री गुरूवे नम:



गुरुचे आपल्या जिवनातील महत्व.

                       प्रत्येकाच्या जिवनात गुरु हा कोणत्याना कोणत्या रुपात असतोच. आपले जिवन घडवण्यासाठी गुरुचे फार मोठे योगदान असते. गुरु हा अंधारातुन आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो, गुरु हा आपल्याला अज्ञानाच्या दिशेतुन ज्ञानाच्या दिशेकडे सुधा घेऊन जातो. गुरु हा प्रत्येक रुपात असतो तो आपल्या मित्राच्या रुपात, आपल्या आईवडिलांच्या रुपात, आपल्या बायकोच्या रुपात, किंवा मुलांचा रुपात किंवा इतर कोणत्याहि रुपात आपल्याला लाभु शकतो. गुरुशिवाय शिष्याचे जिवन हे व्यर्थ असते. पण आपल्या आयुष्यातील प्रथम गुरु हे आपले आई-वडिल असतात. तेच आपल्याला चांगले संस्कार देतात व आपले मनोबल व आत्मविश्वास वाढवतात. व दुसरे गुरु म्हणजे ज्यांच्या कडुन आपण शिष्या ग्रहण करतो ते गुरु आपल्याला जिवनाची अनुभुती करुन देतात व आपण कशा प्रकारे जिवन जगले पाहिजे कशा प्रकारे लढले पाहिजे व कशा प्रकारे मेहनत व संघर्ष केला पाहिजे याचे ज्ञान देतात. आईवडिल हे सत्याचि व वाईटाच्या जाणिव करुन देतात. व जिथे आपण ज्ञान घ्यायला जातो ते गुरु हे आपल्याला कोणत्या चांगल्या दिशेने जायचे याचा मार्ग सांगतात. व आपल्याला प्रोत्साहित करतात. प्रत्येक मनुष्य हा आपला गुरु नसतो, पण ज्याच्याकडुन आपल्याला काहि तरि शिकायला मिळते तो प्रत्येक जण आपला गुरु असतो. गुरु होण्यासाठि कोणत्याहि प्रकारचि वयाचि अट नसते एखादा आपल्यापेक्षा लहान असेल व त्याच्याकडे आपल्या पेशा जास्त ज्ञान आहे ती व्यक्ति हि गुरु बनु शकते गुरु बनण्यासाठि ज्याच्याकडे जि कौशल्य जे गुण आहेत, आपल्यापेशा त्याच्याकडे काहि तरि जास्त आहे त्याच्याकडुन आपण शिकले पाहिजे. 

                    जो शिष्य आपल्या गुरुला विसरतो त्या शिष्याचे आतापर्यंत शिकवलेले सगळे ज्ञान हे व्यर्थ असते. गुरु हा सर्व ज्ञानी असतो, संत कबीर म्हणुन गेले आहेत की जर आपल्या समोर देव व आपले गुरु एकदम समोर आले तर तुम्ही कोणाच्या पाया पडाल, संत कबिर म्हणतात कि आपण गुरु च्या पाया पडले पाहिजे. याचे असे कारण आहे कि पौराणिक ग्रंथामधे सांगितले गेले आहे कि गुरु हा सगळ्या देवांपेशा भरपुर श्रेष्ठ असतो. गुरु मधेच आपण देव बघितला पाहिजे कारण गुरु हा आपल्याला आपले जिवन घडवण्यास मदत करतो. जर गुरु नसता तर महाभारतातील महान अर्जुन सुधा जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धर बनला नसता व नाही महाभारत रामायन घडले असते. पहिलाच्या शिष्य हे ज्ञान घेण्यासाठि आपले घर सोडुन गुरुच्या आश्रमात राहत असत. गुरुला ब्रम्हां, विष्णु, महेश यांच्यापेशाहि मोठे मानले जाते. प्रत्येक धर्मात गुरुला पहिल्यांदा सर्वात श्रेष्ठ मानले व पुजले जाते. 

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा शुभकामनाये :


1) गुरु हा कोळशातुन सोने निर्माण करणारि खाण आहे, चिखलातुन मुर्ति घडविणारा मुर्तिकार आहे, दगडातुन शिल्प तयार करणार शिल्पकार आहे, आणि वेळ आली तर आईबापापरी बनणारा आधार आहे. गुरुपौर्णिमेच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा.

2) माझ्या आजपर्यंतच्या जिवनात ज्यांनि मला घडवल ते म्हणजे माझे आई वडिल ते माझे प्रथम गुरु आहे त्यांना वंदन करुन गुरुपौर्णिमेच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा.

3) गुरुवर्य, मित्र यांच्यासह जिवनात ज्यांनि मला जगायला शिकवलं. अशा प्रत्येकाचा मी आभारी आहे तसेच संकटात जे दरवेळि माझ्या पाठिशि उभे ते सगळे व्यक्ती माझ्या साठि गुरु आहे. ते लहान असो वा मोठा. आपणांस व आपल्या परिवारास गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा.

4) अज्ञानातुन सज्ञानाकडे जाण्याच्या मार्गावर जो साथ देतो आणि मार्गदर्शन करतो अशा महान व्यक्तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा.

5) जो आपल्याला जिवनाचा खरा अर्थ समजवुन सांगतो तो म्हणजे गुरु आपणांस व आपल्या परिवारास गुरु पौरणिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

6) गुरुपौर्णिमाचा दिवस हा सगळ्यांसाठि खास असतो या दिवशि आपण आपले प्रथम गुरू आपले आईवडिल यांना वंदन करुन हा दिवस साजरा केला पाहिजे आपणास व आपल्या परिवारास गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा.


7) गुरुविणा ज्ञान नाहि व ज्ञानाशिवाय जिवन नाहि आपणांस व आपल्या परिवारास गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.