ज्या मुली आपल्या लिमिटेशनच्या
बाहेर जाऊन काहितरि बनण्याचं स्वप्न बघतात व ते स्वप्न साकार सुधा करतात, त्या मुली
काहितरी बनुन दाखवतात देशाच नाव रोशन करतात या मुलींबद्द्ल आपल्याला व पुर्ण देशाला
त्यांचा अभिमान असतो. व ते इतरांसाठि एक प्रेरणा सुधा बनतात. आपण अशाच एका देशाच्या
मुली बद्द्ल जाणुन घेणार आहोत ति म्हणजे कल्पना चावला. कल्पना चावला हि संपुर्ण महिला
व मुलिंसाठि एक प्रेरणादायी महिला ठरलि आहे.
आपल्याला माहित आहे कि कल्पना चावला हि
भारताची दुसरी अंतराळविर व पहिलि महिला अंतराळविर होति. याच्या अगोदर पहिला राकेश शर्मा
हा भारताचा पहिला अंतराळविर होता. कल्पना चावलाला
लहानपणा पासुन अंतराळात काय आहे हे जाणुन घेण्याचि आवड होति तिला प्लेन हवाईजहाज याचि
सुधा आवड होती. कल्पना चावला आपल्या भाऊ बहिनीमधे परिवारातील सर्वात छोटि मुलगी होती.
कल्पना चावला हिचा जन्म हा हरियाना मधिल करनाल येथे 17 मार्च 1962 मधे झाला होता. कल्पना
हि लहानपणापासुनच खुप हुशार होती तिला लाडाने तिचे घरवाले मोटु असे म्हणत. तिने आपल्या
अभ्यासाचि सुरवात टागोर पब्लिक स्कुल मधुन सुरवात केलि. व ति जेव्हा आठविला गेली तेव्हा
तिला विज्ञान क्षेत्रात इंजिनियर बनण्याचि इच्छा व्यक्त झाली. व त्या नुसार ती आपलं
पुढचे शिकण हि कल्पना चावला हि घेत होती. तिच्या आईने तिला याच्यांसाठि भरपुर सपोर्ट
व मदत केली. व तिच्या वडिलांचा विचार असा होता कि तिचि मुलगी हि एक शिक्षिका बनावी.
पण तिला तांत्रिक गोष्टिच्या आवडिमुळे तिला भारतातिल पहिलि महिला अंतराळविर म्हणुन
ओळखले जाणार होते. तिने पुढचे शिक्षण हे पंजाब इंजिनियरिंग कॉलेज मधुन वैमानिक अभियांत्रिकिचे
घेतले. व 1982 मधे तिला इंजिनियरींगचि पदवि सुधा भेटली. पुढच्या शिक्षणासाठि 1982 मधे
कल्पना हि अमेरिकाला रवाना झाली. कल्पना ने 1984 मधे टेक्सास विश्वविद्यालय मधुन वैमानिक अभियांत्रिकचि पदवी प्राप्त केली. कल्पना चावला ने हवाईजहाज, ग्लायडर, विमानचालक हे
उडवण्यात भरपुर प्रशिक्षित झाली व तिने यात हुमारी प्राप्ती केली कल्पना चावला वेगवेगळ्या
प्रकारचे जेट व विमान चालवण्यात प्रारंगत होती, तिला व्यावसायिक विमानचालक आणि हवाईयान
या साठि लाइंसेन्स सुधा भेटले. व त्यानंतर तिला 1988 पासुन ति नासा च्या एम्स अनुसंधान
केंद्र साठि काम सुधा करायला लागली. नासाकडुन कल्पना चावला हिला तिच्या स्वताच्या पहिल्या
उडाना साठि नेमणुक झालि. काहि दिवसाने तिच्या पहिल्या मिशनचि तयार सुरु झाली. ति तिच्या
पहिल्या मिशन मधे 360 तास अंतराळात राहुन पुर्थिपासुन 1.04 करोड किलोमिटर लांब येवढे
अंतर असुन 252 वेळा पुर्थिच्या परिक्रमा घातल्या व त्या मिशन मधे ति यशस्वि सुधा झालि.
त्यानंतर काहि काळाने 2000 मधे स्पेस मधे रिसर्च करण्यासाठि STS-107 उडान कर्मचारि म्हणुन
तिचि नेमनुक करण्यात आली. व तिच्या बरोबर सहा सहकारी सुधा होते काहि तांत्रिक बाबिमुळे
हे अभियाना 18 वेळा रद्द करण्यात आले. शेवटि तो दिवस आलाच ज्या दिवशी हे रॉकेट अवकाशात
जाणार होते 16 जानेवारी 2003 कोलंबिया वर चढुन STS-107 मिशनचि सुरवात करुन ते रॉकेट
अवकाशात सोडण्यात आले.
त्या रॉकेट मधे कल्पना बरोबर अजुन 6 यात्रि होते. ते रॉकेट हे
अवकाशात पोहचले होते. व ते अंतराळविर स्पेस मधिल सर्व माहिति हि नासा पर्यंत पोहचव
होते लगातर 16 दिवस त्यांनि स्पेस मधे काढले. शेवटि तो दिवस आला ज्या व दिवशी भारताची
पुत्री हे जग सोडुन कायमचि जाणार होति. कल्पना चावला व तिचे साथि हे पुर्थिवर परत येत
असताना. त्यांच्या यान मधे तांत्रिक खराबि आली होती पुर्थिच्या वायुमंडळात प्रवेश करताच
कोलंबिया अंतरिशयान याचे तुकडे होऊन पुर्थिच्या दिशेने आले व त्यांच्या यानचे अवशेष
हे अमेरिकेच्या टेक्सास नावाच्या शहरावर पडले 1 फेब्रुवारि 2003 हा भारताच्या सुकण्याचा
शेवटचा दिवस ठरला. पण याचा दोष हा नासाच्या संस्थाला दिला गेला. नासाने जर रॉकेट मधे
असलेल्या तांत्रिक अडचणिचा अगोदरच जर शोध लावला असता किंवा अजुन एकदा तांत्रीक बाबिमुळे
जर हे अभियान रद्द करण्यात आले असते तर हे सगळे घडले नसते. व आपल्या भारताचि कन्या अजुनहि
जिवंत असली असती. पण ति आता या जगात नाहि तरिपण कल्पना चावला हि संपुर्ण मुली व महिलांसाठि
एक प्रेरणादायी ठरली आहे. व आपल्यासाठि ति आपल्या मनात अमर राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comments box